“हिजाब घालणारी मुलगीही एक दिवस पंतप्रधान होईल”

नवी दिल्ली | कर्नाटकमधील हिजाब वाद संपूर्ण देशभर पसरल्याचं पहायला मिळत आहे. हिजाब वादाचे पडसाद सगळीकडे पडत असून राजकीय वातावरणही चिघळलं आहे.

मुस्लीम मुलींना शाळेत हिजाब घालून प्रवेश करु दिला नाही, यावरुन हा वाद सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली.

देशभर शाळेत हिजाब घालण्यावरुन वाद चांगलाच पेटला आहे. अशातच आता एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

असदुद्दीन ओवैसी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओवैसी यांनी हिजाब वादावर वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ओवैसी यांनी म्हटलं की, हिजाब घालणारी मुलगीही एक दिवस पंतप्रधान होईल. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु असल्याचं पहायला मिळत आहे.

हिजाब परिधान केलेल्या महिला महाविद्यालयात जातील, जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, डॉक्टर, व्यवसायिक महिला होतील. मी कदाचित हे पाहण्यासाठी जिवंत नसेन, परंतु माझे शब्द लिहून ठेवा की एक दिवस हिजाब परिधान केलेली मुलगी या देशाची पंतप्रधान होईल, असं म्हणत ओवैसी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

ओवैसीच्या या व्हिडीओनं सध्या सगळयांचंच लक्ष वेधलं आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 खूप झालं…. मला आता तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही- अण्णा हजारे

“लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं…” 

“काय फायली काढायच्या त्या काढा, जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका”

श्रीगोंद्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तीन मित्रांचा जागीच मृत्यू 

Tata आहे तर शक्य आहे! ‘या’ दोन गाड्यांनी तोडले सर्व रेकॅार्ड्स