मुंबई : काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाणं गात भीक मागणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसातच या महिलेचं आयुष्य एवढं बदललं की आता या महिलेला बॉलिवूडसाठी गाण्याच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. एका माणसानं त्याच्या फेसबुक अकाउंटवर या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला होता. जो खूप व्हायरल झाला आणि ही महिला रातोरात स्टार झाली.
रानू मंडल असं या महिलेचं नाव आहे. त्यानंतर तिचा मेकओव्हरही करण्यात आला. आता ही महिला बॉलिवूडसाठी गाणं गाणार असून प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं तिला पहिला ब्रेक दिला आहे. तिच्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. यावरून कोणाचं नशीब कधी आणि कसं पलटेल याचा काही नेम नाही, अशीच चर्चा चालू आहे.
हिमेश रेशमियानं त्याचा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी और हीर’मध्ये गाणं रानू मंडलला ऑफर केलं आहे. नुकताच हिमेशनं तिच्या गाण्याचा हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रानू तिच्या जादुई आवाजात नवीन गाणं गाताना दिसत आहे. तिच्या बाजूलाच हिमेश तिचं गाणं ऐकत उभा असलेला पाहायला मिळत आहे.
हिमेशनं या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं माझा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी और हीर’ यातील असून हे गाणं रानूनं गायलं आहे. तसेच हिमेशनं पुढं लिहिलं की जर तुमच्यात जिद्द असेल तर तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात.
रानू ‘सुपरस्टार सिंगर’ नावाच्या एका नव्या रिअलिटी शोमध्येही दिसणार आहे. त्या शोमध्ये हिमेश आणि परिक्षकांसोबतच सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना भेटणार आहे. हिमेश रानूवर खूपच इम्प्रेस झाला. सलमान खानचे वडील सलीम अंकल यांनी मला सांगितलं होतं की, तुला लाइफमध्ये कधी जर एखादी टॅलेंटेड व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तीला जाऊ देऊ नकोस.’
हा माझा दुसरा जन्म आहे आणि मी त्याला अधिकाधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन, आपल्या बदललेल्या आयुष्याबद्दल बोलताना रानू भावूक होतं बोलल्या.
रानूला आतापर्यंत अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र तिच्यासोठी तिच्या मुलीशी झालेली भेट हे सर्वात मोठं गिफ्ट होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 10 वर्षांपासून आपल्या मुलीपासून दूर गेलेल्या रानूला तिची मुलगी परत मिळाली.
महत्वाच्या बातम्या-
-जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!
-सर्वात कमी सरासरी असणाऱ्या ‘या’ खेळाडूंनी सावरला भारताचा डाव!
-काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; नरेंद्र मोदींचा पराभव करणं अशक्यच
-उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा; रणजित निंबाळकर म्हणतात…
-पी. चिदंबरम हे ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक; शिवसेनेची ‘सामना’तून टीका