रायगडावरील पिंडदानाचे हिंदुत्वादी संघटनाकडून समर्थन; म्हणाले, “संभाजी ब्रिग्रेडचा आरोप…”

रायगड | महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या रायगडावरील (Raigad) समाधीजवळ पिंडदान कार्यक्रम होत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. व्हिडिओ सामज माध्यमांवर प्रसारीत झाल्यावर सर्व स्तरांतून संतापाची लाड उसळली होती.

शनिवारी किल्ले रायगडावर शाक्त पद्धतीने शिवाजी महारांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी संभाजी ब्रिग्रेडचे (Sambhaji Brigade) अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या प्रकाराला विरोध केला.

या प्रकाराची तत्काळ चौकशी करुन तेथे उपस्थित असलेल्या पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिग्रेडने प्रशासनाकडे केली. आता यावर राज्यातील हिंदुत्वादी संघटनांनी भाष्य केले आहे.

पिंडदान हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. घरोघरी देखील ही प्रथा पाळली जाते. त्यामुळे रायगडावर पितरांचे पिंडदान करण्यात गैर काय? असा प्रश्न हिंदुत्वावादी संघटनांनी उपस्थित केला.

केवळ यावर्षी नाही तर गेली अनेक वर्षे युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या यौध्यांसाठी हे तर्पण केले जात असल्याचे शिवाजी महाराजांच्या अनुयायांकडून सांगितले जात आहे. गडावर हिंदू विधींना कोणाताही विरोध करण्याचे कारण नाही, असे देखील संघटनांचे मत आहे.

रायगड किल्ल्यावर राम धुरी (Ram Dhuri) आणि त्यांचे सहकारी 2008 सालापासून हा विधी दरवर्षी करतात. मराठ्यांच्या साम्राज्यात युद्धात प्राण गमावलेल्या योद्धांसाठी ते हा विधी करत असतात, असे संघटना म्हणत आहेत.

हा संपूर्ण हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे संभाजी ब्रिग्रेडने त्यांला विरोध करणे योग्य नाही. त्यांनी या पिंडदानापूर्वीचा हेतू आणि पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी होती, असे हिंदुत्वावादी संघटना म्हणत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर उज्वल निकम यांचे भाष्य; न्यायालयाकडे प्रामुख्याने तीन प्रश्न आहेत ते म्हणजे…

“आज मुख्यमंत्री अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता”; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्तविली शक्यता

“शाळांमध्ये सरस्वती आणि देवींच्या फोटोएवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत” – छगन भुजबळांच्या वक्तव्याने भाजप आक्रमक

“2014 ला मला उपमुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण…”; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

नाना पटोले तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर संतापले; म्हणाले, “सावंतांची तत्काळ…”