‘हिंदुस्तानी भाऊ’ला अटक होण्याची शक्यता, शेकडो विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप

मुंबई | राज्यातील अनेक भागात आज विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं केली आहेत. मुंबईतील धारावी, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली.

रस्त्यावर उतरलेल्या काही विद्यार्थ्यांनी बसेसची तोडफोड केली. अनेक बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. अचानक विद्यार्थी उतल्यानं पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाल्याचं पहायला मिळालं.

अशातच सोशल मीडियावरील स्टार हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याने विद्यार्थ्यांनी भडकवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हिंदुस्थानी भाऊने इन्स्ट्राग्रामवर व्हिडीओ शेअर करत थेट ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे आता पोलिसांना त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा मागणीला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर तो वर्षा गायकवाड यांना भेटण्यासाठी गेला होता.

वर्षा गायकवाड यांना लवकरात लवकर परीक्षा रद्द करावी, मुलांची शिक्षा माफ करावी यासाठी निवेदन दिलं आहे, असं त्याने म्हटलंय. सरकारने ऐकलं नाही तर याच ताकदीने पुन्हा उतरु, असं हिंदुस्तानी भाऊने म्हटलं आहे.

दरम्यान पोलिसांनी माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला अटक होणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”

परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं

 अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…”