हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामशी; सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून नवा वाद

नवी दिल्ली | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सध्या काॅंग्रेस नेत्याचा वादग्रस्त दावा प्रचंड गाजत आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत रहाणारे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद पुन्हा एकदा आपल्या पुस्तकातील एक टिपण्णीवरून वादात सापडण्याची चिन्ह आहेत.

सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम या पुस्तकाचं नुकतच प्रकाशन पार पडलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन पार पडत नाही तोच यातील काही विशिष्ट लिखाणावरून या पुस्तकावर बंदीची मागणी होत आहे.

सदरील पुस्तकातील द सॅफ्राॅन स्काय या प्रकरणात हिंदु धर्माबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. परिणामी या पुस्तकावरून सध्या देशभर जोरात वाद पेटला आहे.

ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षात हिंदुत्वाच्या आक्रमक स्वभावामुळं मागं पडला आहे, असं खुर्शीद यांनी लिहील आहे.

आक्रमक हिंदुत्व आयसिस आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरूपासारखचं आहे, असं वादग्रस्त लिखाण खुर्शीद यांनी केलं आहे.

भाजपकडून या पुस्तकातील पान क्रमांक 113 चा दाखला देण्यात आला आहे. परिणामी सध्या सर्वत्र खुर्शीद यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.
भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत खुर्शीद यांच्या या पुस्तकातील लिखाणाचा आणि खुर्शीद यांचा जाहीर निषेध केला आहे. काॅंग्रेस पक्षावर मालवीय यांनी जोरदार टीका केली आहे.

सलमान खुर्शीद यांच्या या पुस्तकातील या वादग्रस्त लिखाणाबद्दल खुर्शीद यांच्याविरोधात नवी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, खुर्शीद यांनी यापुर्वीही आपल्या वादग्रस्त वागण्यानं काॅंग्रेस पक्षाला अनेकदा अडचणीत आणलं आहे. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद उफाळून आल्यानं काॅंग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”

  फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”