हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होत आहे. उद्धव ठाकरेंनी सभेला संबोधित करताना भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीनगरचा पाणीप्रश्न बिकट होता. संभाजीनगरमध्ये 1972 सालची पाण्याची जुनी योजना सुरू करणार आहे. पाणी योजनेसाठी निधी पुरवणार आहे. कंत्राटदाराने हयगय केली तर दया, माया दाखवणार नाही. एकही रूपया कमी पडू देणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईत औरंगाबाद मेट्रो आणि इतर विकास कामांची घोषणा करणार नाही. व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार करणार आणि मगच विकास करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायचीये” 

“किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू” 

“…तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही” 

लेडी सचिनचा क्रिकेटला अलविदा; मिताली राजची निवृत्तीची घोषणा 

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”