मुंबई| सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता. मुनमुन नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. ती सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
मुनमुननं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानंं सगळ्यांनाच वेड लावलं आहे. त्यामुळे ती अनेकांची आवडती बनली. यातच तिची एक जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मुनमुननं तिला अनेक विचित्र घटनांचा सामना करावा लागला, असं सांगितलं होतं.
व्हायरल होणारी ही पोस्ट 2017 मधील #Me Too चळवळीची असलेली पहायला मिळत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा ती लैगिक शोषणाची बळी झाली होती. #MeToo ची लाट भारतात आली तेव्हा अनेक अभिनेत्रींनी मोकळेपणाने आपले अनुभव शेअर केले. मुनमुन दत्ता हिनेदेखील आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला होता.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुनमुननं लहानपणापासून तिच्यासोबत झालेल्या अत्याचारावर लिहिलं होतं. मुनमुनने लिहिलं, ‘हो मी सुद्धा #Me Too, अशा प्रकारे अनेक महिलांचं या विषयावर भाष्य करणं या समस्येच्या गंभीरतेची जाणीव करून देतं. मला अशा पुरुषांची संख्या पाहून आश्चर्य वाटतंय ज्यांना महिलांचे हे आरोप ऐकून धक्का बसलाय. नाही इतकं आश्चर्य वाटून घेऊ नका. तुमच्या घरात, तुमची बहीण, आई, पत्नी इतकच नाही तर कामवाल्या बाईसोबतही हे झालेलं असू शकतं. त्यांना एकदा विश्वासात घेऊन विचारा, त्यांची उत्तरं कदाचित तुम्हाला हैराण करतील.
मी तर त्या वाईट आठवणींना लिहीतानादेखील रडतेय कारण मला खूप त्रास होतोय. ते आठवणं जेव्हा मी छोटी होती आणि माझ्या शेजारचे काका मला वाट्टेल तिथे स्पर्श करायचे. कुणाला न सांगण्याबद्दल धमकावायचे. मी त्यांना खूप घाबरायची किंवा ते काका ज्यांनी मला माझ्या जन्माच्या वेळेस पाहिलं होतं आणि १३ वर्षानंतर मला पाहिल्यावर त्यांना वाटलं की माझं शरीर हात लावण्या योग्य झालं आहे.’ असंही मुनमुननं म्हटलं.
पुढे मुनमुनने लिहिलं, ‘कोणाकोणाबद्दल सांगू, तो ट्यूशन टीचर ज्याचा हात माझ्या अंतवस्त्रांच्या आत होता किंवा तो दुसरा शिक्षक ज्याला मी राखी बांधायचे. तो ट्यूशनमधील इतर मुलींच्या ब्राचे पट्टे ओढायचा. त्यांच्या छातीवर हात मारायचा. तो व्यक्ती जो तुम्हाला ट्रेनमध्ये पकडतो… का? कारण तुम्ही तरुण आहात आणि बोलायला घाबरता. तुम्हाला माहितीये काहीतरी चुकीचं होतंय पण तुमचा आवाज गळ्यातच अडकलाय. तुम्हाला माहीत नाहीये की घरातल्यांना कसं सांगायचं. इथूनच तुम्हाला सगळ्या पुरुष जातीचा राग यायला सुरुवात होते. अशी घाणेरडी भावना येते ज्यातून सावरायला तुम्हाला अनेक वर्ष लागतात.’
मुनमुनने पोस्टच्या शेवटी लिहिलं होतं की, ‘आज मी त्या पुरुषांना मारून टाकेन जो माझ्यासोबत असं काही करण्याचा प्रयत्न करतील. मी जी काही आहे मला त्यावर गर्व आहे.’
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला प्रेक्षकाकडून चांगली प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतल्या आहेत. या मालिकेला अनेक वर्ष होऊनही या मालिकेची लोकप्रियता थोडीही कमी झालेली नाही.
View this post on Instagram
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
चक्क तरूणाने केलं आपल्या मावशीसोबत लग्न, वाचा काय आहे प्रकरण
अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर सेटवर घडायच्या…
बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीने खाल्ला आपल्या…