33 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनी केंद्राला झुकवलं

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना देशातील 3 नवीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. तसेच 33 वर्षांपूर्वीच्या घटनेची चर्चा सुरू आहे.

वडील महेंद्रसिंग टिकैत यांनी 33 वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.

1988 साली महेंद्रसिंग टिकैत यांनी केलेल्या शेतकरी आंदोलनापुढे तत्कालीन केंद्र सरकाराला झुकावं लागलं होतं. आता राकेश टिकैत यांच्या पुढाकाराने होत असलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला माघार घेऊन तीन नवे कृषी कायदे रद्द करावे लागले.

महेंद्रसिंग टिकैत यांनी 1988 साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते.

विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. त्यावेळी लाल किल्ला परिसरात शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला होता.

महेंद्रसिंग टिकैत यांनी सादर केलेल्या 35 मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन केंद्रातील राजीव गांधी सरकारने दिले. केंद्र सरकार झुकल्यानंतर महेंद्रसिंग टिकैत यांनी आंदोलन मागे घेतलं होतं.

महेंद्रसिंग टिकैत यांना राज्य आणि केंद्र सरकार घाबरायचं. या आंदोलनाची उष्णता दिल्लीपर्यंतही जाणवत होती.

सरकारला हे आंदोलन कोणत्याही प्रकारे संपवायचं होतं पण महेंद्रसिंग टिकैत मागे हटायला तयार नव्हते. या प्रयत्नात दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी राकेश टिकैत यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जातं. यानंतर अखेर राकेश टिकैत नोकरी सोडून घरी परतले.

राकेश टिकैत यांनी वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या भारतीय किसान युनियनमध्ये प्रवेश केला आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली.

2011 मध्ये महेंद्रसिंग टिकैत यांच्या निधनानंतर राकेश टिकैत आणि त्यांचा भाऊ नरेश यांनी भारतीय किसान युनियनची सूत्रे हाती घेतली.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार 

‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी 

‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर