दुचाकीला धडक देत तब्बल 4 वेळा कार हवेत उडाली अन् मग…; पाहा घटनेचा लाईव्ह व्हिडीओ

नागपूर | नागपूर-अमरावती रोडवर गुरुवारी अतिशय भीषण अपघात घडला आहे. नागपूर-अमरावती रोडवरून अतिशय वेगानं जाणाऱ्या एका कारनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृ.त्यू झाला आहे. घटनेचा व्हिडीओ घटनास्थळी असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

10 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नागपूर अमरावती रोड वरील वाडी परिसरातील सेवा मारुती शो रूम समोर ही दुर्दैवी घटना घडली आहे. संतोष भोंगाडे ( वय 40 ) हे आपल्या स्कूटरवरून चालले होते. सेवा मारुती शो रूम समोरील चौकात आल्यानंतर त्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी गाडी वळवली.

भोंगाडे यांनी चौकातून गाडी वळवली नेमकी त्याचवेळी समोरून अतिशय वेगानं एक कार आली. या कारनं भोंगाडे यांच्या स्कूटरला जोरात धडक दिली. कारनं धडक देताच स्कूटर काही फूट लांब फेकली गेली. तसेच कारही हवेत उडून  तब्बल चार वेळा पलटली आणि खूप दूर जाऊन थांबली.

अपघाताचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामधून समोर आला आहे. या अपघातामध्ये संतोष भोंगाडे गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी अपस्थित असणाऱ्या लोकांनी तातडीनं त्यांना रुग्णालयात हलवलं.

संतोष भोंगाडे यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृ.त घोषित केलं. संतोष भोंगाडे हे भोंगाडे कुटुंबातील कर्ता पुरुष होते. यामुळे संतोष भोंगाडे यांच्या अशा अपघाती मृ.त्युनं भोंगाडे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“दिल्लीत एका युवकानं पवारांना हाणलं होतं, जितेंद्र आव्हाड हे विसरलेले दिसत आहेत”

‘हे कायद्याचं राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचं?’; ‘या’ भाजप नेत्याचा शिवसेनेला टोला

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांत आणि रियाला गां.जा पुरवणारी ‘ही’ व्यक्ती गजाआड

भाऊ शौविककडून ‘ही’ चूक झाली अन् रिया एनसीबीच्या जाळ्यात अडकली

रिया चक्रवर्तीला फसवलं जात आहे – स्वरा भास्कर