मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी दिले आहेत. इतकंच नाही, तर आदित्य ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिलेच सदस्य असतील.
आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचं नेतृत्व करावं, अशी मागणी वरळी मतदारसंघातील गटप्रमुखांनी केली होती. या मागणीवर अनिल परब यांनी शिक्कामोर्तब तर केलंच, पण इथला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असंही जाहीर केलं.
वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा ‘ए प्लस’ मतदारसंघ आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारे या मतदारसंघातील दिग्गज एकाच मंचावर उपस्थित आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचं निश्चित करावं, असं मत अनिल परब यांनी भाषणात व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेनं ग्रीन सिग्नल न दिल्यामुळेच राणेंचा भाजप प्रवेश रखडला; चंद्रकांत पाटलांची कबुली- https://t.co/1wAMT3LRjR #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
“मी दिल्लीत खासदार, निलेश आणि नितेश विधानसभा लढवणार” – https://t.co/o4l0cEkLeg @MeNarayanRane @NiteshNRane @meNeeleshNRane
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
“शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंच्या पक्षाचं विलिनीकरण नाही” – https://t.co/hrpQb3K2kM @Dev_Fadnavis @MeNarayanRane @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019