टोमॅटोमध्ये व्हायरस शिरल्याची अफवा, विश्वास ठेवू नका!

अहमदनगर | कोंबड्यावरील रोगाचा मानवांना संसर्ग होत असल्याची चर्चा याआधी अनेकदा पसरवण्यात आली. तशीच चर्चा आता टोमॅटोवरील रोगासंबंधी सुरू आहे. याबाबत भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी तातडीनं खुलासा केला आहे.

टॉमेटोच्या पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, असं अजित नवले यांनी केलं आहे.

वनस्पती बाधक विषाणू आणि प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणं कायदेशीर गुन्हा आहे, असं अजित नवले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अफवा पसरवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडीओ एडिट करून वापरले जात आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असं आवाहन किसान सभेने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू; एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण

-आत्मनिर्भर कृषीविषयक पॅकेजच्या घोषणांवर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

-…म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी!

-कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे- एकनाथ शिंदे

-“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”