सापाचं तो़ंड धरुन जबरदस्ती दुधात बुडवलं, त्यानंतर असा अंगाशी आला ‘हा’ प्रकार!

डोंबिवली | डोंबिवली मधील नीरव गोगरी हा तरुण साप पकडून त्यांच्यासोबत स्टंटबाजी करत असतो. त्याबरोबरच, त्यांचे व्हिडिओ काढून सोशल मीडियासह यू-ट्यूबवरही टाकत असतो. आता हेच सापाशी खेळणं या तरुणाच्या अंगाशी आलं आहे.

नागपंचमीच्या दिवशी नीरव याने आसपासच्या परिसरात फिरणारे साप पकडून आणले. त्यानंतर सापाचे तोंड पकडून तो तेथील रहिवाशाच्या गळ्यात घालत होता. त्याबरोबरच साप कधीही दूध पित नाही हे माहीत असतानाही जबरदस्तीने महिलांनी आणलेल्या दुधाच्या वाटीत सापाचे तोंड बुडवत होता.

नीरव याने या सर्व स्टंटबाजीचा व्हिडिओ एका व्यक्तीकडून बनवून घेतला. हा व्हिडिओ सोशल मिडियासह यू-ट्यूबवरही टाकला. वनविभागाच्या निदर्शनास हा व्हिडिओ येताच त्यांनी नीरवचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आहे. वन अधिनियमाप्रमाणे याच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहासाठी सापांशी स्टंटबाजी करत असल्याचं नीरव यानं सांगितलं आहे. वन कायद्यानुसार साप व अन्य पशू पक्ष्यांशी खेळणं त्यांना हाताळण गुन्हा असल्यामुळे या तरुणावर कायदेशीर कारवाई केल्याची माहिती कल्याणच्या वनक्षेत्र अधिकारी कल्पना वाघोरे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उदयनराजेंचा शपथविधी वादग्रस्त ठरल्यानंतर आता राज्यपालांचं उपराष्ट्रपतींना पत्र, म्हणाले…

कॅप्टन एका ठिकाणीच बसलेत, अन् मी मात्र फिरतोय- शरद पवार

“रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर आता तरी झेंडा फडकवू नका”

कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम

आता मुख्यमंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण; म्हणाले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्या!