नवी दिल्ली | भारत हा चारचाकी वाहनांसाठी आघाडीचा बाजार बनत आहे. देशात दैनंदिनपणे मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री होताना दिसत आहे.
केंद्र सरकारच्या बदललेल्या वाहन धोरणामुळं देखील देशात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या खास फिचरच्या गाड्या घेऊन सहभागी होत आहेत.
होळीच्या सणानिमित्तानं Honda कंपनीच्या गाड्या सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. परिणामी ग्राहकांसाठी मोठी संधी असणार आहे.
होन्डा अमेज या कारवर 4 हजार रूपयांची काॅर्पोरेट सुट देण्यात आली आहे. कारवर कोणतीही रोख सवलत किंवा एक्सचेंज बोनस मिळणार नाही.
होन्डा जॅझवर तब्बल 10 हजार रूपयांची सवलत दिली जात आहे. 4 हजार रूपयांच्या कार्पोरेट डिस्काऊंटसह 5 हजार रूपये एक्सचेंज बोनस मिळणार आहे.
होन्डा सिटी 5 माॅडेलवर 10 हजार रूपयांची रोख सवलत किंवा 10 हजार 596 रूपयांच्या मोफत अॅसेसरीज मिळणार आहेत. परिणामी ग्राहकांना चांगली संधी आहे.
सेडानवर 5 हजारांचा एक्सचेंज बोनस, 8 हजारांची कार्पोरेट सुट मिळत आहे. 5 हजार आणि 7 हजारांचा लाॅयल्टी बोनस मिळत आहे. या ऑफर्स 31 मार्चपर्यंत असणार आहेत.
दरम्यान, होळी सण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना अनेक कंपन्यांनी आकर्षक ऑफर ठेवत ग्राहकांनी आकर्षित केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा
जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!
कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले…
‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
“भाजपचा शिमगा रोज सुरूये, आम्ही शिमगा सुरू केला तर…”