राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला हॉलिवूडमधून पाठिंबा; अभिनेत्याने केले ट्वीट

नवी दिल्ली | अलीकडच्या काळात हॉलिवूडमधील (Hollywood) अनेक कलाकार भारतीय राजकारण आणि अनेक गोष्टींवर आपल्या प्रतिक्रिया आणि मते द्यायला लागले आहेत.

ऑस्करसारख्या (Oscar Award) मानाच्या पुरस्कारांमध्ये राजमौली यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाला स्थान न मिळाल्याने चक्क हॉलिवूडमधील काही निर्मात्यांनी एकत्र येत, याचा निषेध वर्तविला होता.

आता हॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक जॉन क्यूसैक (John Cusack) याने राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेवर भाष्य केले आहे. त्याने ट्वीट करुन राहुल गांधींच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे.

जॉन क्यूसैक या दिग्दर्शकाने आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, भारतीय खासदार राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मीर (Kanyakumari to Kashmir) अशी पदयात्रा करत आहेत. त्याला एका वापरकर्त्याने धन्यवाद म्हंटले आहे.

त्याला पुन्हा प्रतिक्रिया देताना जॉन क्यूसैक म्हणाला, होय – एकता – सर्वत्र सर्व फॅसिस्टांविरोधात. यापूर्वी देखील दिल्लीच्या सीमांवर झालेल्या शेतकरी आंदोलनाला जॉन क्यूसैक यांनी पाठिंबा दिला होता.

त्याचबरोबर त्यांनी सीएए (CAA) आणि एनआरसीविरोधात (NRC) झालेल्या आंदोलनाला देखील पाठिंबा देणारे ट्वीट केले होते. त्यांनी या कायद्याला विरोध केला होता. आणि आंदोलक विद्यार्थ्यांचे समर्थन केले होते.

जॉन क्यूसैकने 1980 सालापासून चित्रपटांत अभिनय करण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविले होते.

महत्वाच्या बातम्या – 

“आम्हाला गद्दार म्हणण्यापूर्वी…”; अजित पवरांना शंभुराज देसाईंचा इशारा

नाना पटोलेंची एकनाथ शिंदेवर मोठी टीका; म्हणाले, सध्याचे नवीन हिंदूहृद्यसम्राट…

अखेर अशोक गहलोत अध्यक्षपदाचे उमेदवार; आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण?

भाजपात प्रवेश करणार का? एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा; वाचा सविस्तर वृत्त