अमित शहा स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी जाणार?

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कलम 370 कलम हटवल्यावर गृहमंत्री अमित शहा आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोलले जात आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी गृहमंत्री श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवणार असल्याचं कळतंय. अमित शहा गुरुवारी श्रीनगरला भेट देण्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी तिथे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर हे राज्य दोन केंद्रशासीत प्रदेशात विभागले. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील पोलीस मुख्यालयाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या काश्मीर खोऱ्याच्या दौऱ्यावर असून तेथिल परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्वातंत्र्यदिनी ते श्रीनगरमधील लाल चौकात उपस्थित राहणार असल्याचीही माहिती मिळत आहे. 

अमित शहा काश्मीर खोऱ्यात भेटीसाठी जाणार आहेत मात्र कोणत्या तारखेला जाणार याचा त्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्याने हा सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या काश्मीर खोऱ्यातील भेटीबाबात आता सांगणे शक्य नाही, असं एका गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितलं. 

दरम्यान, श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवणं अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय घटना ठरेल. 

महत्वाच्या बातम्या-

-तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटलांची दमदाटी

-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रितेश देशमुखने केली 25 लाखांची मदत

-अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेेदवारीसाठी भाजपकडून कँम्पेन

-“माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत पण मी देशभक्त आहे”

-काश्मीरला वाचवणं आपलं कर्तव्य आहे- दिग्विजय सिंह