मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडणार? महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

मुंबई | सचिन वांझेंच्या अ.टकेमुळे महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. या प्रकरणामुळे विरोधक आणि सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाची जोरदार खेळी चालू आहे. या प्रकरणाचा परिणाम आता राज्य मंत्रिमंडळावर पाहायला मिळू शकतो, असं बोललं जात आहे.

नुकतंच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या मंत्रिमंडळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचं बोललं जात आहे. तसेच मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची खांदेपालट होऊ शकतो, असं देखील बोललं जात आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे असलेले गृहमंत्रीपद त्यांच्याकडून काढून घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे पद आता महाविकास आघाडीतील दुसऱ्या नेत्याकडे सोपविण्यात येणार आहे.

अनिल देशमुख हे शरद पवारांचे विश्वासू आणि अगदी जवळचे मानले जातात. मात्र, गेल्या वर्षभरात ते आपली जबाबदारी नीट पार पाडू शकले नाहीत. गेल्या वर्षभरात त्यांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण ते सचिन वांझे अटक प्रकरण अनेकवेळा अनिल देशमुख यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले. विरोधकांनी देखील गृहमंत्री पदावरून महाविकास आघाडीला टार्गेट केलं. यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही जेष्ठ नेते त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

सचिन वांझे अ.टक प्रकरणानंतर महाविकास आघाडीतील अनिल देशमुखांना पहिला फटका बसू शकतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतरही काही अंतर्गत बदल करण्यात येऊ शकतात.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राठोड यांचा देखील वनमंत्री पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे. राज्य मंत्रिमंडळातील ते पद देखील रिकामं आहे. या पदी शिवसेनेच्या बाहेरील एखाद्या नेत्याची नेमणूक करण्याची तयारी सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात, ‘या’ अभिनेत्रीवर झाला गुन्हा दाखल

ठाण्यात मेन रोडवर कार झाडाला धडकून जागेवर पलटली अन् मग…; पाहा व्हिडीओ

कचरा गोळा करणाऱ्या भावांना मिळाली ‘या’ शोमध्ये गाण्याची संधी, लोकांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ताजमहालचं नाव आता राम महल होणार? भाजप नेत्याचा मोठा दावा