Top news महाराष्ट्र मुंबई

कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप!

मुंबई |  सध्या देशावर तसंच महाराष्ट्रावर कोरोनाचं भीषण संकट आहे. मात्र कोरोनायोद्धे या संकटाच्या परिस्थितीत अगदी नेटाने लढत आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी या संकटात त्यांच्या खाकीचा दम महाराष्ट्राला दाखवून दिला आहे. यातच कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला आमची साप्ताहिक सुट्टी नको, असं जबाबदारीपर पत्र लिहीत साताऱ्याच्या दोन पोलिसांनी  कर्तव्य किती क्षेष्ठ आहे हे दाखवून देण्याच्या प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला गृहमंत्र्यांनी देखील नवाजलं आहे.

बी.बी.डी.एस पथकात ते नियमित कर्तव्य बजावत आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तावर असणाऱ्या निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले यांनी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. त्यांनी तसं सविस्तर पत्र पोलिस अधिक्षकांना लिहिलं आहे.

सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले या दोन पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे, या दोघांची कर्तव्याप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, असं गृहमंत्री म्हणाले आहेत.

गृहमंत्र्यांनी ट्विट करून या दोघांचं अभिनंदन केलं आहे तसंच कौतुक देखील केलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “#Covid19 च्या पार्श्वभूमीवर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तावर असणाऱ्या निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले यांनी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. या दोघांची कर्तव्याप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे.”

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा न घेता देशाला वेळ द्यायला हवा होता”

-पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन

-योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत घेतलेला निर्णय माणुसकीला धरून नाही- संजय राऊत

-मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत

-कोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय