“ओबीसी निवडणुकीपूर्वी ओबीसींना आरक्षण मिळेल”; मविआतील मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यासह देशातील राजकीय वातावरण सध्या आरक्षण या एकाच विषयाभोवती फिरताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये तर जोरदार शाब्दिक लढाई चालू आहे.

सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला धक्का देत ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार म्हटल्यावर वाद तर होणार होताच. अशातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणाबाबत कारवाई करण्यात येत आहे. आम्ही पाठपुरावा करत आहोत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ओबीसी आरक्षण लागू झालेले असेल, तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे जातीनं ओबीसी आरक्षणाची लढाई लढत आहेत. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे, असंही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. परिणामी सर्व पक्षांनी आता ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाप्रमाणं तयारी चालू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर

“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन” 

“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?” 

“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…