कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

पुणे | गुन्हेगारांना पकडताना पोलिसांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं. आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर राज्याची सेवा करणारे पोलीस आपण पहात असतो.

सिनेमात अनेकदा आपण पोलीस अधिकाऱ्यांना साहसी भूमिका साकारताना पाहिलं आहे. सिनेमातलं ते चित्र पहाताना छान वाटतं पण प्रत्यक्षात मात्र ते फार धाडसी काम आहे. ते काम महाराष्ट्र पोलीस सातत्यानं करत आलेत.

राज्य पोलीस दलातील एक सिंघम स्टाईल अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना ओळखण्यात येतं. पिपंरीतील वाढती गुन्हेगारी आवाक्यात आणण्यात त्यांचा मोठा हात आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्ण प्रकाश यांनी काही गुन्हेगारांवर कारवाई केली होती. त्या कारवाईची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात करण्यात आली. अशात आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पिंपरी भागातील काही कुख्यात गुन्हेगांरांना पकडताना गुन्हेगारांमध्ये आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्या रात्री कृष्ण प्रकाश यांनी कारवाईचं नेतृत्व केलं होतं.

अंधाराच फायदा घेवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गुन्हेगारांना प्रकाश यांनी झाड फेकून मारलं होतं. त्यांच्या या कारनाम्याची चर्चा सर्वत्र झाली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत आणखीन माहिती मागवल्याचं सांगितलं आहे.

कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकलं की नाही याबद्दल माहिती नाही. चौकशी करून सांगतो, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. दिलीप पाटील यांनी असं म्हणताच उपस्थित सर्वांनाच हासू अनावर झालं होतं.

पोलीस आयुक्तपदावरील एखादा अधिकारी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतो ही चांगली बाब आहे, असं म्हणत वळसे पाटील यांनी कृष्ण प्रकाश यांच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

दरम्यान, कृष्ण प्रकाश यांनी अनकेदा आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळं गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी सध्या कृष्ण प्रकाश यांना राज्यात रिअल सिंघम म्हणून ओळखलं जातं.

महत्वाच्या बातम्या –

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार

प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!

“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”

ओमिक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!