नवी दिल्ली | मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. अशाच नेहमी चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे हंसिका मोटवाणी. फिल्मी करिअरच्या सुरुवातीलाच हंसिका एका न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत आली होती.
स्टार वाहिणीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेतून हंसिका घराघरात पोहोचली होती. या मालिकेत तिने बालकलाकार म्हणून उत्तम भूमिका साकारली होती. आज हंसिका दक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मालिकेतील बालकलाकार ते सुप्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास पार करणाऱ्या हंसिकाने गेली वीस वर्ष प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. सध्या आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री एकेकाळी हार्मोनल इंजेक्शन घेत असल्याची बातमी समोर आली होती.
वयाने मोठं दिसण्यासाठी हंसिका हार्मोनल इंजेक्शनांचा वापर करत असल्याचं बोललं जातं. त्यावेळी हंसिका किंवा तिच्या कुटुंबाने यावर बोलण्यास नकार दिला होता. हंसिकाने एका चित्रपटात तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा असणाऱ्या हिमेशसोबत देखील रोमान्स केला होता.
छोट्या पडद्यावर काम करुन प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर 2003 साली हंसिकाला ह्रतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातील हंसिकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
यानंतर हंसिकाने दक्षिणात्य चित्रपटांवर आपलं लक्ष केंद्रीत केलं. 2007 साली हंसिका ‘देसमुदुरू’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. मस्का, पवार, मेघम्मा, वालू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये हंसिकाने काम केलं आहे. तिला साऊथ फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून देखील पुरस्कार मिळाला आहे.
याच दरम्यान हंसिकाच्या चेहऱ्याशी मिळता जुळता चेहरा असणाऱ्या तरुणीचा एक न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओमधील तरुणी हंसिकाच असल्याचं बोललं जाऊ लागलं. हंसिकाने प्रसिद्धीसाठी हा व्हिडीओ केला असल्याच्या चर्चा त्यावेळी चालू होत्या.