“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”

मुंबई | गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी केली होती. नाहीतर मशिदीबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता.

आदेश आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी भोंगे लावत हनुमान चालिसा लावली. काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत भोंगे काढले. पण यानंतर राज्यात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाजात तेठ निर्माण करणाऱ्यांवर देखील पोलीस कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलं आहे, असंही ते यावेऴी म्हणाले आहेत.

लोकांच्या खिशात पैसे नाहीत. गॅस, पेट्रोल, डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा आहे, अशी टीका देखील आव्हाड यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल अदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचे राजीनामे

“गद्दारी ती गद्दारीच, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी…”, नारायण राणे कडाडले

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

…तर चंद्रकांतदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करू – संजय राऊत