Top news आरोग्य कोरोना देश विदेश

फोनवर कोरोना व्हायरस किती दिवस जिवंत राहतो?, आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ त्यावर लस शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा संसर्ग होऊ लागला, तेव्हा शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, कोरोना विषाणू तीन तास ते सात दिवसांपर्यंत सक्रिय राहू शकतो.

पण नुकतेच ऑस्ट्रेलियात झालेल्या एका संशोधनातून कोरोना विषाणूसंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. कोरोना विषाणू मोबाईल स्क्रीनवर आणि अन्य काही साफ वस्तूंवर २८ दिवस सक्रिय राहतो. हा विषाणू कमी तापमान असणाऱ्या ठिकाणी जास्त वेळ सक्रिय राहतो.

जिथे जास्त तापमान आहे, तिथे हा विषाणू खूपच कमी वेळ सक्रिय राहतो. एसडीपी (अमेरिकेन सेंटर फॉर डिसीज प्रिपेअरनेस) या संस्थेने केलेल्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे. कमी तापमान असलेल्या वस्तू म्हणजेच पारदर्शक वस्तूंवर जास्त काळ सक्रिय राहतो.

तसेच स्वच्छ दिसणाऱ्या काच, स्टेनलेस स्टील सारख्या वस्तूंवर कोरोनाचा विषाणू जास्त वेळ सक्रिय राहतो. सीएसआयआरओ (कॉमनवेल्थ साइंटिफिक ऍन्ड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायजेशन) व ऑस्ट्रेलियातील नॅशनल सायन्स एजन्सी यांनाही संशोधनात एक महत्त्वपूर्ण गोष्ट आढळली आहे.

विषाणू हा प्लास्टिक नोटांऐवजी कागदाच्या नोटांवर जास्त वेळ सक्रिय राहतो. हे अध्ययन विज्ञानाच्या व्हायरोलॉजी नियतकालिकेत प्रकाशित झाला आहे. एसडीपीचे संचालक प्रा. ट्रेवर ड्रियु यांच्या माहितीनूसार काही विषाणू बाहेर सक्रिय राहतात.

पण ते किती वेळ संक्रमित राहतात हे त्यांच्या प्रकार, संख्या, वातावरण, अवस्था या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. संशोधकांच्या मते कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी आणि त्याचा प्रसार कमी होण्यासाठी आजूबाजूला नेहमी स्वच्छता आणि वेळोवेळी हात धुणे खूपच गरजेचे आहे.

एसडीपीचे उपसंचालक डेबी इगल्स यांनी सांगितले की, २० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी कोरोना विषाणू जास्त वेळ सक्रिय राहतो. त्यातल्या त्यात मोबाईलच्या स्क्रीनवर २८ दिवस सक्रिय राहतो. ३० ते ४० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या गोष्टींचेही परीक्षण केले.

त्यात असं आढळलं की, तिथे कोरोना विषाणू सक्रिय राहण्याचे प्रमाण कमी आहे. त्यांनी हा प्रयोग अंधारातही केला होता. तिथे युवी लाईट व सूर्याच्या किरणांमुळे कोरोनाचे विषाणू सक्रिय राहण्याचे प्रमाण खूपच कमी होते. कारण तिथे पडणाऱ्या प्रकाशामुळे सक्रिय राहण्याचे प्रमाण कमी होते. आता या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे सर्वांनीच काळजी घेणे खूपच गरजेचे आहे, जेणेकरून कोरोनाचे संक्रमण कमी होईल.

महत्त्वाच्या बातम्या-