राहुल गांधींची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. अशात राहुल गांधी यांच्या संपत्तीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्र दिलं होतं. यामध्ये त्यांनी मालमत्तेशी संबंधित संपूर्ण माहिती दिलीये.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी 15 कोटी 88 लाखांपेक्षाही अधिक संपत्तीचे मालक आहेत. 2014 साली राहुल गांधींकडे 9.4 कोटींची संपत्ती होती.

एकूण संपत्तीमधील 5 कोटी 19 लाख रुपये त्यांनी शेअर मार्केट आणि म्युचुअल फंडमध्ये गुंतवले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राहुल गांधींकडेही (Rahul Gandhi) शेतीही आहे. ही शेती दिल्लीच्या सुलतानपूर गावात आहेत, जी त्यांना वारसाहक्कानुसार मिळाली आहे. याशिवाय त्यांच्याकडे 333.3 ग्रॅम सोनं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय 

“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही” 

Presidential Election | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी बातमी; भाजपच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना फोन 

“…तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी”