बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेशबाबूची संपत्ती किती?; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

मुंबई | सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत बॉलिवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री अशी लढाई पाहायला मिळत आहे. या वादावर अनेक सेलिब्रिटी बोलले पण साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार महेश बाबू यांच्या वक्तव्याने वादात आणखीन भर पडली आहे.

महेशबाबूने हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. इतकंच नाही तर बॉलीवूडच्या लोकांना परवडत नाही आणि हिंदी सिनेमात रसही नाही असंही त्याने म्हटलं आहे.

महेश बाबू हे साऊथ इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत तो अनेक बॉलिवूड कलाकारांशी स्पर्धा करतो. एवढंच नाही तर कमाईच्या बाबतीतही तो बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.

महेश बाबू हे साऊथ इंडस्ट्रीचे बादशाह आहेत. त्याची फॅन फॉलोइंग जोरदार आहे. चाहते त्यांच्या चित्रपटांची मनापासून वाट पाहतात आणि त्यांचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धमाल करतात.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. महेश बाबू एका चित्रपटासाठी 55 कोटी रुपये घेतात पण आता अभिनेत्याने त्याची फी वाढवली आहे. आता तो एका चित्रपटासाठी 80 कोटी रुपये घेत आहे.

महेश बाबू यांची संपत्ती करोडोंमध्ये आहे. अहवालानुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 32 दशलक्ष आहे. भारतीय चलनात पाहिले तर महेश बाबू यांची एकूण संपत्ती 244 कोटी रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू, 2024 मध्ये परत एकदा निवडून येऊ” 

संभाजीराजेंनी उचललं मोठं पाऊल, पत्रकार परिषद घेत केली ‘ही’ घोषणा 

उत्तर कोरियात कोरोनाचे दोन रूग्ण आढळताच किम जोंगची मोठी घोषणा! 

 केवळ अफलातून! गणेश मंडळाचा अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा प्रवास

सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा