नवी दिल्ली | देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केली आहे. यानंतर 20 लाख कोटीमध्ये किती शून्य येतात, असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला. निर्माला सीतारामन यांनी यासंबंधी ट्विट करताना त्यांच्याकडून चूक झाली.
आत्मनिर्भर भारत अभियान’च्या दृष्टीने हे आर्थिक पॅकेज ही मोठी घोषणा आहे. या आर्थिक पॅकेज भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के ( सुमारे 20 लाख रुपये) वचनबद्ध आहे. याने एमएसएमई आणि प्रामाणिक मध्यमवर्गीयसाठी मदती होईल.” #selfreliant India असा हॅशटॅग देखील सीतारमण यांनी दिला आणि यानंतर त्यांनी पीएमओइंडिया आणि नरेंद्र मोदी यांना टॅग केले. सीतारामण यांच्या ट्वीटमध्ये मोठी चुकी झाली. ती म्हणजे त्यांनी 20 लाख कोटी ऐवजी 20 लाख लिहिले.
ही चूक सीतारमण यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी दुसरे ट्वीट करत म्हणाले, टायपिंगमध्ये चुक झाल्याबद्दल मला सर्वांनी माफ करा, 20 लाख कोटी रुपये असे लिहून चुक दुरुस्त केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग ऐकते आणि प्रेरणा घेते. 130 कोटी भारतीय आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली बाळगून वाटचाल करतील तर यश निश्चितच मिळेल. 2०,००,००० कोटी असं दिसतात – 2०००००००००००००! गणित बरोबर आहे ना? बहुधा”, अनुपम खेर यांचं ट्विटही काही वेळात व्हायरल झालं.
Sorry everybody for the typo: please read as Rs 20 lakh crore. https://t.co/w3x6p59ifl
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 12, 2020
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर खडसेंचं निश्चित स्वागत करु’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर
-तुमच्या प्रेमाला कधीच विसरणार नाही; ‘या’ दोघांसाठी अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट
-…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही; एकनाथ खडसेंचा पक्षनेतृत्वाला इशारा
-मोदींनी दिलेला आधार उद्योग क्षेत्र कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी