कोरोना काळात डिप्रेशनमधून कसे वाचावे ? गायक हरिहरन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स…

मुंबई | देशात कोरोनाचे संकट आहे. या संकटामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक, पोलीस, इत्यादी अनेकांनी अविरत सेवा दिली. या सर्व कोरोना वॉरियर्स यांना सलाम करण्यासाठी ‘हेल्थगिरी २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात कोरोना वॉरियर्स यांना सलाम करण्यासाठी दिग्गज गायक हरिहरन यांनी संवाद साधला. समीक्षक सईद अन्सारी यांनी गायक हरिहरन यांच्याशी गप्पा मारल्या. सध्याच्या कठीण परिस्थितीत आपले आरोग्य चांगले कस ठेवायचं आणि एकमेकांना यातून कसं वाचवायच याबद्दल गायक हरिहरन यांनी सांगितले.

हरिहरन म्हणाले,”आपण घरी बसून सुरक्षित आहे. पण आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण खूप विचार करून जातो. आपण हे योग्य करतोय की नाही. तुम्ही कोरोना वॉरियर्सबद्दल विचार करा. ते आपला जीव धोक्यात घालतात आणि ते दुसऱ्यांचा विचार करतात. ते आपल्या कामाची पूजा करतात.”

हरिहरन यांनी ‘भारत हमको जान से प्यारा है’ हे गाणं गाऊन त्यांनी कोरोना वॉरियर्सला सलामी दिली. कोरोना वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालतात, पण ते त्याचा विचार करत नाही. जर त्यांनी त्याचा विचार केला तर काम करू शकणार नाही.

मला आज डॉक्टर आणि सैनिकांमध्ये काहीच फरक दिसत नाही. आज ते नसते तर काय झाले असते. जे लोक वाचले आहेत ते यांच्यामुळेच वाचले आहे. ते आज दिवसरात्र काम करत आहे. हरिहरन म्हणाले,”आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगासन करा. प्राणायाम करा.”

पुढे बोलताना म्हणाले,”मेडिटेशन करा. कारण तुम्हाला माहित नाही, तुम्ही डिप्रेशन जात आहात. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर तुम्ही कधी रुग्ण व्हाल, याचा अंदाज तुम्हाला लागणार नाही. सर्वांचे हास्य गायब झाले आहे. सर्व चिंतेत आहे, पण हसणे गरजेचे आहे.”

कुटुंबात दोन वेळेचे जेवण सोबत केले पाहिजे, त्यावेळी मोबाईल आणि लॅपटॉप वापरू नका. यावेळी तुम्ही फक्त गप्पा मारणे गरजेचे आहे, हे आज कठीण झाले आहे. कारण सध्या लोक गप्पाच मारत नाही. ही आता एक नवीन गोष्ट झाली आहे. त्यामुळे भरपूर गप्पा मारा.

हरिहरन यांनी विचारले की, तुम्ही कोरोना काळात काय केले ? तेव्हा यावर हरिहरन यांनी उत्तर दिले,”मी टाळेबंदीत माझा एक अल्बम पूर्ण केला आणि दुसरा करत आहे. नशिबाने माझ्या घराजवळ एक स्टुडिओ होता. पहिल्या तीन महिन्यात गेलो नाही पण नंतर गेलो होतो. यात मला माझ्या मुलानेही मदत केली. त्याचबरोबर ऑनलाईन कार्यक्रम करून गरजूंना मदत केली.”

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतला न्याय मिळणार का याबाबत साशंकता?; जिजाने शेअर केला ‘हा’ फोटो

‘आयएएस’च्या स्वप्नाआड पैशांची आली अडचण, तिथंही धावून आला सोनू सूद!

रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला नवा रेकॉर्ड, विराट कोहलीलाही टाकलं मागे!

अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, सुशांतच्या चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

बिग बॉसच्या सर्वात महागड्या स्पर्धकांमध्ये राधे माँ; रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!