Top news आरोग्य देश

सकाळी सकाळी फक्त ‘हा’ उपाय करा; काही दिवसांनी चष्मा काढून फेकून द्याल

चष्मा हा आजकाल अनेकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. चष्म्याचा नंबर कमी व्हावा यासाठी अनेकजण अनेक प्रकारचे उपाय करताना आपल्याला दिसतात. मात्र ते कधी यशस्वी होतात तर बऱ्याचदा त्याचा काहीच उपयोग होत नाही. आम्ही आपल्याला असेच काही उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील-

-डोळा हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या म्हणीप्रमाणे आपल्याला डोळाच नसेल तर काय होईल याचा एक क्षण विचार करुन पाहा. त्यामुळे डोळ्याची निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे.

-डोळ्यांची स्वच्छता या विषयावर आपल्या समाजात फार जागरुकता नाही. त्यामुळे अनेकांना चष्मा लागणे किंवा डोळ्यांचे अन्य विकार उद्धभवताना दिसतात. मात्र हा अत्यंत नाजूक अवयव असल्याने त्यावर उपाय करतानाही काळजी घ्यावी लागते.

-आज लहान थोरांपासून अनेकांना चष्मा लागलेला असतो. अशा लोकांनी तर डोळ्यांची चांगली निगा राखायला हवी, त्यासोबतच ज्यांना चष्मा लागलेला नाही त्यांनी सुद्धा भविष्यात आपल्याला चष्मा लागू नये किंवा डोळ्यांचे विकार होऊ नयेत यासाठी काळजी घ्यायला हवी.

डोळ्यांचे व्यायाम-

-डोळ्यांची निगा राखायची असेल तर डोळ्यांचे व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये एखाद्या वस्तूवर नजर स्थीर ठेवून बघणं. काही काळ एकटक दूरवर पाहणं तसेच डोळे गोल गोल फिरवणं अशा प्रकारच्या व्यायामांचा समावेश होतो. यामुळे डोळ्यांच्या मसल्सचा व्यायाम होतो जो डोळे दीर्घकाळ चांगले ठेवण्यासाठी मदत करतो.

-डोळे चांगले रहावेत ते चांगले दिसावेत असं प्रत्येकाला वाटतं, मात्र हे सगळं अवलंबून असतं आपल्या आहारावर, ज्या व्यक्तीच्या आहारात  विटॅमिन ए चा भरपूर वापर केलेला असतो, त्या व्यक्तीचे डोळे अधिक चांगले आणि निरोगी असतात.

-विटॅमिन ए आपल्याला कोणत्या खाद्य पदार्थांपासून मिळतं ते आपल्याला माहीत असायला हवं. पपई, गाजरातून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळतं. तसेच गाईचं तूप हा देखील विटॅमिन ए चा मोठा स्त्रोत मानला जातो.

-शेवग्याच्या शेंगा देखील डोळ्यांसाठी चांगल्या सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदात याचं महत्त्व विषद केलेलं आहे. काही डोळ्यांचे ड्रॉप देखील शेवग्याच्या शेंगांपासून बनवलेले असतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचा आहारातील समावेश डोळ्यांसाठी फायद्याचा ठरु शकतो.

-सकाळी सकाळी हिरवळीवर चालणे हा व्यायाम देखील अत्यंत फायद्याचा सांगितला जातो. हिरवळीवर दवबिंदू पडलेले असताना पायाच्या तळव्यांना या दवबिंदूमुळे थंडावा मिळतो, हा थंडावा थेट डोळ्यांपर्यंत पोहोचतो ज्याचा डोळ्यांना चांगलाच फायदा फोटो

अशा प्रकारे आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो. व्यवस्थित काळजी घेतल्यास आयुष्यभर आपले डोळे निरोगी आणि तेजस्वी राहतील. चष्म्याची देखील गरज लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

घोणस आणि नागाच्या ल.ढाईचा थ.रार; मांजर मध्येच काय करतंय, पाहा व्हिडीओ

टीम इंडियाच्या ‘या’ 6 खेळाडूंना महिंद्रा कंपनी ‘थार एसयुव्ही’ गिफ्ट देणार

सोने-चांदी खरेदी करण्याची हीच आहे वेळ! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव उतरले

अमेरिकनं भारतीयांसाठी दिली गुडन्यूज; या नियमात मोठा बदल

श्रीलंका क्रिकेटमध्ये से.क्स स्कॅं.डल? वैद्यकीय कर्मचारी महिलेबर खेळाडूने लैं.गिक गै.रवर्तन केल्याच्या आ.रोप