कोरोना काळात वाफ कशी घ्यावी?, 5 महत्त्वाचे नियम, नाहीतर काहीच उपयोग नाही

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे

कोरोना विषाणूपासून आपलं संरक्षण करण्यासाठी अनेकजण आपल्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण वेगवेगळ्या प्रकारचे काढे करून पित आहेत, तर काही गरम पाणी पित आहेत. याचप्रमाणे काही लोक दररोज नित्यनियमाने पाण्याची वाफ घेतात.

मात्र ती वाफ घेताना ती कशी घेतली पाहिजे? याचे बऱ्याच जाणांना माहित नसते. जर तुम्ही वाफ चुकीच्या पद्धतीने घेतलीत, तर तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याचविषयी म्हणजेच वाफ कशा पद्धतीने घेतली पाहिजे याचे पाच नियम सांगणार आहोत.

  1. केवळ गरम पाण्याची वाफ घेणे- साधे पाणी घेऊन ते गरम करणे आणि त्याची वाफ घेणे. त्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश करू नये.
  2. वाफ घेताना नाकाने श्वास घेणे- अनेक जणांना वाफ घेताना प्रश्न पडतो की, श्वास नाकाने घ्यायचा की तोंडाने? तर वाफ घेताना नाकानेच श्वास घ्यावा. जेणेकरून वाफ लांबपर्यंत नाकात जाते आणि नाक मोकळे होण्यास मदत होते.
  3. वाफ किती वेळा घ्यावी- वाफ दिवसांतून फक्त तीन वेळाच घ्यावी. यापेक्षा जास्त घेऊ नये. वाफ सकाळी उठल्यावर त्यानंतर अकरा-बारा वाजचताच्या दरम्यान आणि रात्री जेवन झाल्यानंतर घ्यावी. अशाप्रकारे वाफ घेतल्यास अनेक प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात.
  4. छातीवर वाफ घेणे- छातीच्या सभोवताली किंवा छातीवर वाफ घेतली, तर फुफ्फुसांची कार्यक्षमाता वाढण्यास मदत होते. तसेच छातीवर वाफ घेताना पाण्यात सैंधव मीठ घालून त्याची वाफ घेतली तर त्याचे दुप्पट फायदे होतो.
  5. वाफ घेताना डोळ्यांची काळजी घेणे- ज्यावेळी आपण वाफ घेतो, त्यामुळे डोळ्यावर जाणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे असते. नाहीतर डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते

महत्वाच्या बातम्या-

सेक्स एज्युकेशन विषयी माहिती देणाऱ्या ‘या’…

प्रेमाची एक गोष्ट अशीही! ‘या’ व्यक्तीनं…

चाकासारखी गोलगोल फिरतच राहिली, चिमुकलीचा ‘हा’…

आजीचा पदर धरत ‘बाहेर जाऊ नकोस करोना होईल’…

चक्क चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी पद्धत, पाहा व्हायरल…