नवी दिल्ली | देशाच्या वरिष्ठ सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आक्रमक भाषणानं जोरदार रंगत आणली आहे. देशाच्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मोदी राज्यसभेत उपस्थित होते.
नरेंद्र मोदींनी विविध मुद्द्यांच्या आधार घेत देशाच्या इतिहासावर भाष्य केलं आहे. मोदींना आपल्या भाषणादरम्यान काॅंग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. परिणामी मोदींच्या या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं देशाला मोठा धक्का बसला आहे. अशात आता मंगेशकर यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत मोदींनी काॅंग्रेसला चांगलंच घेरलं आहे. परिणामी देशाचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
लता मंगेशकर यांचं कुटुंब गोव्यात वास्तव्यास होतं. तत्कालिन सरकारनं मंगेशकर यांच्या परिवारावर अन्याय केला आहे, असं मोदी म्हणाले आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात आल्यानं केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे.
लता मंगेशकर यांचे बंधू पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीवरून काढण्यात आलं होतं. मोदींनी मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख करताना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर देखील टीका केली आहे.
ह्रदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर सादर केल्यावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं, असा आरोप मोदींनी काॅंग्रेसवर केला आहे. परिणामी राज्यसभेतील वातावरण तापलं आहे.
मंगेशकर यांच्यावर घडलेला प्रकार हा मंगेशकरांनीच एका मुलाखतीत सांगितल्याचा दावा मोदींनी केला आहे. मोदींच्या या दाव्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. मोदींनी राज्यसभेत अनेक विषयांवर बोलताना तत्कालिन काॅंग्रेस नेत्यांवर टीका केली आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच राजकारण त्यांच्याच नावाभोवती फिरायला लागल्यानं सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काॅंग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही”
“मोदींनी पंतप्रधानपदी बसवणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान केलाय”
मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर महाराष्ट्रात संताप; ट्विटरवर #महाराष्ट्रद्रोही_BJP हॅशटॅग होतोय ट्रेंड!
अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकराची मोठी झेप; बुलडाण्याचा राजू केंद्रे फोर्ब्सच्या यादीत झळकला