चेन्नई | जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. या महामारीमुळे तर अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे. तर दुसरीकडे काही लोक माणुसकी जिवंत असल्याची अनुभती देत होते.
कोरोनातच मुसळधार पावसानंही सगळीकडे हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेलं पहायला मिळालं. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे आलेल्या संकटातून सावरत असताना पावसानंही थैमान मांडलं आहे.
थंडी सुरु झाली तरीही अजून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. यातच मुसळधार पावसामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या अनेक भागात पाणी शिरलं. तर चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली होती.
तामिळनाडूत झालेल्या पावसात एक तरुण बेशुद्ध पडला होता. या अडकलेल्या तरुणाची महिला पोलीस अधिकाऱ्यानं जीवाची बाजी लावत मदत केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भर पावसात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी महिला अधिकाऱ्यानं भर पावसात त्याला खांद्यावर उचलून घेत बाहेर काढलं आणि दवाखान्यात पोहचवलं. त्यांच्या या माणुसकीचं आणि कामाचं कौतुक केलं जात आहेत.
या पोलीस महिलेचं नाव राजेश्वरी आहे. हा व्हिडीओ टीपी छत्रम येथून समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून महिला अधिकाऱ्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर शेअरही केला जात आहे.
कोरोनामुळे आलेल्या संकटातून सावरत असताना पावसानं थैमान मांडलं आहे. अनेक ठिकाणी अजूनही तुरळक पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांनासाठीही आता चिंतेंचं वातावरण झालं आहे.
या काळात सोशल मीडियावर अनेक भयानक व्हिडीओ व्हायरल झाले. अनेक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आले. अशातच आता यात आणखी एक व्हिडीओची भर पडली आहे. सध्या चेन्नईतील मुसळधार पावसातील एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH तमिलनाडु: चेन्नई में महिला पुलिस इंस्पेक्टर राजेश्वरी ने रास्ते पर पड़े एक बेहोश आदमी को कंधों पर उठाकर रेस्क्यू किया और अस्पताल पहुंचाया। pic.twitter.com/jDS9M6Djvw
— ANI_HindiNews (@AHindinews) November 11, 2021
महत्त्वाच्या बातम्या –
“जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”
“कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, ओव्हर डोस घेऊन जास्त बोलतीये”
“कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी”
‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखांचे बनले 1 कोटी
“राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”