सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणाऱ्या ‘या’ गाडीची चाहत्यांना भुरळ, लूक देखील आहे अगदी भन्नाट

मुंबई | गेल्या काही वर्षांपासून सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी काही महत्त्वाची पाऊलं उचलत आहे. तेव्हापासून इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक देखील इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहेत.

पूर्वी या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती खूप जास्त होत्या. यामुळे लोक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यास पसंत करत नव्हते. मात्र, आता त्याची चिंता राहिली नाही. अलीकडे या गाड्यांच्या किंमती खूप खाली आल्या आहेत.

अशातच आता आणखी एका कार कंपनीने आपली हटके इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्सने त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केली आहे. हमर इलेक्ट्रिक एसयूव्ही, असं या कारला नाव देण्यात आलं आहे.

कंपनीने ही कार सादर करताच चाहत्यांना याची भूरळ पडली आहे. या कारचा लूक आणि फिचर्स पाहून वाहनप्रेमी ही गाडी खरेदी करण्यासाठी उत्साही झाले आहेत. मात्र, ही कार घेण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागेल. कंपनीच्या मते ही कार शोरूममध्ये दिसण्यास 2023 उजाडेल.

कंपनीचा या कारबद्दल असा दावा आहे की, ही एक सर्वात सक्षम आणि आकर्षक सुपरट्रॅक आहे. यामुळे आता ही गाडी प्रत्यक्षात कशी असेल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी चाहते या कारची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हमर इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, समोरच्या बाजूला नवीन बोल्ड ग्रिल आहे. तसेच या गाडीचं इंटेरिअर डिझाईन देखील जसबरदस्त आहे. याच्या डॅशबोर्डमध्ये मोठी इन्फोटेनमेंट टच स्क्रीन दिली गेली आहे. यात एक इन्फिनिटी रूफ डिझाइन देखील आहे जे रिमूवेबल रूफ पॅनेलसह दिले गेले आहे.

ही कार सिंगल चार्जमध्ये 563 किलोमीटरपर्यंतचं अंतर पार करू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. हम्मर ईव्ही 3.5 सेकंदात 96 किमीचा वेग पकडू शकते. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 58. 70 लाख रुपये आहे.

तसेच हमर इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये पॉवर विंडोज देखील दिल्या गेल्या आहेत. याशिवाय गाडीमध्ये माऊंटिंग फ्रेम्सदेखील दिल्या आहेत. समोर आणि मागील भागात ई लॉकरसह इतरही काही महत्वाचे फिचर्स देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

कोल्हापुरात भर रस्त्यात राडा! नगराध्यक्षांनीच ग्रामस्थाच्या कानाखाली लगावल्याने गदारोळ; व्हिडीओ व्हायरल

काय बोलावं आता! टीव्हीवर लाईव्ह असतानाच कुत्र्यानं तिच्या हातातला माईक खेचला अन्…; पाहा व्हिडीओ

राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे आज भाग्याचा दिवस, नक्की वाचा

वाहह! अवघ्या 9 रुपयांत मिळेल घरगुती गॅस सिलिंडर, जाणून घ्या काय आहे भन्नाट ऑफर?

काय सांगता! मुख्यमंत्र्यांच्याच हेलिकॉप्टरला मारावा लागला धक्का; व्हिडीओ व्हायरल