आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. त्या ठिकाणची एक आठवण म्हणून फोटो काढतात. तर काहीजण व्हिडीओ शूट करून त्या ठिकाणची आठवण जतन करुन ठेवतात.
असाच एक काही पर्यटकांचा जंगल सफारी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जगंल सफारी करताना आपल्याला सिंह किंवा इतर प्राणी आपल्यासमोर आले तर आपला निम्मा जीव जातो. इथं तर चक्क सिंह पर्टकांवर झेप घेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन पर्यटक जंगल सवारी करण्यासाठी जंगलात फिरत असल्याचं दिसतं आहे.
जीपमध्ये दोन व्यक्ती असून, अचानक त्यांच्यासमोरून जोरात सिंह धावत येताना दिसतो. सिंह आपल्या गाडीकडे येत असल्याचं पाहून ते दोघे जाम घाबरल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.त्यानंतर त्या सिंहाने पुढे जाऊन एका हरणाला धरले असल्याचं पाहायला मिळतं आहे.
परंतू हे सगळं अचानक घडलं असल्यामुळे त्यांच्या काहीच लक्षात आलं नाही. काही वेळानंतर त्या दोन व्यक्तींच्या लक्षात येतं की तो सिंह आपल्याकडे नाहीतर, त्याच्या शिकाऱ्याचा पाठलाग करत होता. हे पाहिल्यानंतर तेव्हा त्यांच्या जीवात-जीव आला.
हा व्हिडीओ ‘@sweetsanade’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना यूजरने ‘THIS IS NUTS’ असं कॅप्शनही दिलं आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत अडीच लाख लोकांनी पाहीला असून, अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.
THIS IS NUTS pic.twitter.com/rk1cpMa445
— Sanade 🇯🇲🇺🇸 (@sweetsanade) April 12, 2021
महत्वाच्या बातम्या-
जाणून घ्या! कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे उत्तम
महाराष्ट्र दिन यंदाही साधेपणानेच; राज्य सरकारच्या सूचना जारी
IPL 2021: चेन्न्ईचा सलग पाचवा विजय, चेन्नईची टीम पॉईंट्स…