चक्रिवादळाचा इशारा; महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळदार पावसाची शक्यता

मुंबई| गेल्या वर्षाभरापासून एकीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानाने नको-नकोस केलं आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक पीकांचे नुकसान होतं आहे.

कडाडीचा उन्हाळा जाणवायला लागला असताना, अशातच पुन्हा पाऊस डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात तापनात मोठा बदल घडल्यामुळे काही भागात पुढील काही दिवसामध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

आजपासून अरबी समुद्रात ‘तॉक्ते’ नावाच्या चक्रीवादळाच्या निर्मितीला सुरूवात होणार असून किनारपट्टी परिसरातील वातावरणात झपाट्यान बदल होतं आहे. 16 मे रोजी सकाळपर्यंत अरबी समुद्रात मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील 24 तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 15, 16  आणि 17 तारखेला कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी दिली आहे.

16 आणि 17 तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल.

हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

सुमारे 40 टक्के लोक अद्याप शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना जर मान्सून चांगला झाला तरच शेतीत फायदा होतो. पण जर मान्सूनने धोका दिला तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं.

महत्वाच्या बातम्या – 

‘कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा…

वजन कमी करण्यासाठी चक्क मांजर करतीय एक्सरसाईज, पाहा व्हायरल…

‘लव यू जिंदगी’ म्हणणाऱ्या तरुणीचा कोरोनाशी लढा…

साप पकडताना अचानक शिरला साप लुंगीमध्ये अन्…, पाहा…

वादळी वाऱ्याने चीनचा काचेचा पूल तुटला; 330 फूट उंचावर लटकच…