घाई करा! येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो सोन्या-चांदीचा दर; वाचा आजचे दर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ होत असलेली पहायला मिळत आहे. कोरोना काळात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे सोने खरेदी करणारांची मोठी पंचाईत झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये मोठी घट होताना दिसत होती.

सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये सोन्याची मोठी मागणी वाढली आहे. सोनं चांदी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली आहे. अशातच सोन्या चांदीचे भाव देखील पुन्हा जोर धरु लागले आहेत.

गेल्या महिन्याच्या शेवट म्हणजेच 31 मार्च 2021 रोजी 24 कॅरेट सोन्याचे भाव 44 हजार 190 रुपये प्रती तोळा होते. गेल्या 10 दिवसांत या दरात तब्बल 2 हजार 67 रुपयांची वाढ झाली आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा दर 46 हजार 257 रुपये प्रती तोळा आहे.

सोन्याप्रमाणेच गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात देखील वाढ अनुभवायला मिळाली आहे. 31 मार्च रोजी चांदीची किंमत 62 हजार 862 रुपये प्रती किलो होती. हीच किंमत आज 66 हजार 253 रुपये प्रती किलो आहे. अशाप्रकारे चांदीच्या किंमतीत गेल्या 10 दिवसांत तब्बल 3 हजार 391 रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जाऊ तशी सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या –

बाबो! ‘या’ ड्रायव्हरनं असं काही केलं की गेंड्यानं गाडीला दणादण आदळलं; पाहा व्हिडीओ

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लूकवर चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

आज ‘या’ भागात कोसळणार पाऊस, हवामान खात्याने दिला…

‘एवढी गचाळ का राहतेस?’; टीका करणाऱ्या महिलेला…

अहो काकी भाजी कितीला देणार?; ‘या’ फोटोमुळे…