काँग्रेस पलटलं… दलवाईंनी राहुल गांधींना तोंडावर पाडलं; म्हणतात, सावरकरांचा स्वातंत्र्यासाठीचा त्याग मोठा

सोलापूर |  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस कायमच आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आली आहे. मात्र आज काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्यासाठीचा त्याग मोठा आहे. त्यांचं स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान विसरता येणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. तो सोलापूरात बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना माफीसाठी पत्र लिहिल्याचं काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भर सभेत म्हटलं होतं. त्यांचा दावा आज दलवाई यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. काही जण म्हणतात की सावरकरांनी माफीसाठी पत्र लिहिलं. पण मला त्यात वाद निर्माण करायचा नाही आणि त्या वादात पडायचंही नाही, अशी सावध भूमिका दलवाई यांनी मांडली.

शिवसेना सातत्याने स्वातंत्र्यवीर सावकरांच्या विचारांचा पुरस्कार करत आलीये. त्यांना भारतरत्न दिला जावा, अशी मागणीही शिवसेना गेले काही वर्ष करत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेकदा पक्षाच्या वतीने बाजू मांडलीये. तर त्यांच्या भारतरत्नला विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या जेलमध्ये कोठडीत पाठवायला पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं होतं.

राऊतांच्या अंदमान वक्तव्यावर ते आता त्यांच्या बोलण्याला लगाम घालतील, असं दलवाई म्हणाले आहेत. एकंदरितच दलवाई यांनी सावकरांविषयीच्या मांडलेल्या भूमिकेवर काँग्रेसचं काय मतं आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? अजित पवार यांचं खास शैलीत उत्तर

-तुम्ही इथले प्रमुख… मी तुम्हाला स्वत: खुर्चीत बसवलंय; मुख्यमंत्र्यांच्या आदराने तहसीलदार भारावले

-आभाळाएवढा बाप गेल्याचं दु:ख निबंधातून मांडणाऱ्या मुलाला मंत्री धनंजय मुंडे करणार मदत!

-शाहू महाराज आज जिवंत असते तर CAA आणि NRC कायदा टराटरा फाडला असता- हसन मुश्रीफ

-“भाजपच्या काळात बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास होत होता, आता विकासाची गाडी रूळावरून घसरलीये”