नवी दिल्ली | पती पत्नीचं भांडण ही एक सामान्य गोष्ट आहे. घराघरात नवरा बायकोची छोटी मोठी भांडणं ही होतच असतात. परंतु काहीवेळा हीच भांडणं घटस्फोटाच्या मुद्यापर्यंत येऊन पोहोचतात. सध्या हरियाणा मधील अशाच एका पती पत्नीच्या घटस्फोटाची आणि घटस्फोटामागील कारणाची चर्चा सर्वत्र चालू आहे.
हरियाणातील एका पत्नीने आपल्या पतीचा एवढा मानसिक छळ केला की, पतीचे तब्बल 21 किलो वजन घटले. यामुळे पतीने सरळ आपल्या पत्नीकडून घटस्फोट घेतला आहे. ही घटना आहे हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील.
2012 साली या जोडप्याचा विवाह झाला होता. दोघांना एक मुलगी देखील आहे. परंतु संबंधित पती हा अपंग आहे. त्याला ऐकू येत नाही. आपल्या पत्नीने लग्न झाल्यापासून केव्हाच आपल्या कुटुंबियांशी जुळवून घेतलं नाही.
तसेच ती खूप रागीट स्वभावाची आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरुन ती रागवत होती. तिला खूप जास्त पैसे खर्च करण्याची सवय आहे. लग्न झाल्यापासून तिने माझा मानसिक छळ केला आहे, असे आरोप पतीने पत्नीवर केले आहेत.
पत्नीमुळे आपले 21 किलो वजन घटल्याचा आरोप देखील पतीने केला आहे. लग्नापूर्वी आपले वजन 74 किलो होते. परंतु लग्नानंतर ते 21 किलोने कमी होऊन 53 किलोवर आल्याचं पतीने सांगितलं आहे.
दरम्यान, हे जोडपं 2016 साली एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. पत्नी आपल्या पतीपासून विभक्त झाल्यापासून तिने मुलीची देखील भेट घेतली नाही. आता कौटुंबिक न्यायालयाने या दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका फोनकॉलमुळे अक्षयने ब्लॉकबस्टर सिनेमा हातचा गमावला!
‘या’ पाच बड्या अभिनेत्री होत्या अक्षयच्या गर्लफ्रेंड, एकीसोबत तर दोनवेळा केला होता साखरपुडा
‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ
‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल