तीन बायकांची ‘ती’ इच्छा पूर्ण करण्यासाठी पठ्ठ्यानं दिला सरकारी नोकरीचा राजीनामा!

नवी दिल्ली | तीन बायकांच्या तक्रारीला वैतागलेल्या एका पतीने सरकारी नोकरीचाही (Government Jobs) राजीनामा दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने नोकरी (Jobs) सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी त्याच्या बॉसने त्याचा राजीनामा न स्वीकारता एक पर्याय सांगितला.

इराकमधील एका सैनिकाने आपल्या पत्नीसाठी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. आपला राजीनामा त्याने आपल्या कमांडरकडे सुपूर्द केला.

राजीनामा देण्याचं सैनिकाचं कारण ऐकून कमांडर हैराण झाले. आपण आपल्या तिन्ही बायकांच्या तक्रारीच्या कटकटीला वैतागून नोकरी सोडत असल्याचं त्याने सांगितलं.

आपला पती आपल्याला पुरेसा वेळ देत नाही. एका सैनिकाचं राजीनामा देण्याचं है कारण समजताच कमांडरलाही धक्का बसला. त्याने त्याचा राजीनामा स्वीकारला नाही. पण त्याने त्यावर वेगळा मार्ग त्याला दिला.

तिन्ही पत्नींना खूश कऱण्यासाठी सुट्ट्या दिल्या. त्याला तब्बल 12 दिवसांची सुट्टी देण्यात आली आणि प्रत्येक पत्नीसोबत चार दिवस राहून तिला खूश ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“हिंदूंवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहील” 

जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा…- देवेंद्र फडणवीस 

भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे- चंद्रकांत पाटील 

‘आ देखें जरा किसमे कितना है दम’; नवाब मलिकांचं भाजपच्या ‘या’ नेत्याला ओपन चॅलेंज 

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!