देश

बायकोकडून नवऱ्याला बेदम मारहाण; फोटो पाहून कोर्टानं दिली सुरक्षा

Despair

नवऱ्यानं बायकोला मारहाण केल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल… मात्र कधी बायकोनं नवऱ्याला मारहाण केल्याचं ऐकलंय का? हो… हे खरं आहे. बायकोनं मारहाण केल्यानं एका नवऱ्याला चक्क कोर्टात दाद मागावी लागली. एवढंच नव्हे तर मारहाणीमुळे 90 टक्के शारीरिक अपंगत्व आले असून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप पीडित पतीने कोर्टात केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

संजीव शर्मा असं या पीडित नवऱ्याचं नाव आहे. ते दिल्लीतील रहिवासी आहेत. संजीव शर्मा यांच्यातर्फे कोर्टात वकील आदित्य अग्रवाल यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. संजीव शर्मा यांची पत्नी मुलांना आणि त्यांना मारहाण करते. तसेच त्यांच्या तीन गाड्यांचीही पत्नीनं तोडफोड केल्याचा आरोप कोर्टात करण्यात आला.

कोर्टानं पत्नीला पाठवली नोटीस-

संजीव शर्मा यांच्या पत्नीला कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता दोघांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पीडित नवऱ्याला दिली सुरक्षा-

दिल्ली कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुरक्षा दिली आहे. तसेच कोर्टाने स्थानिक उपजिल्हाधिकाऱ्याला सर्व बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पत्नी करत असलेली मारहाण आणि कथित शिव्यांवर लक्ष ठेण्यास सांगितले आहे.

चर्चा करुन वाद सोडवण्याचा सल्ला-

दिल्ली कोर्टातील न्यायाधीश नजमी वजिरी यांच्या खंडपीठानं संजीव शर्मा यांना न्याय दिला आहे. कोर्टाने संजीव शर्मा यांना पत्नीशी चर्चा करून वाद सोडवण्याचा सल्लाही दिला आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही कोर्टाने सुनावले आहे.