Top news देश

केटीएमसह हुस्कवार्नाच्या गाड्यांच्या किंमती वाढल्या, वाचा कोणत्या गाडीची किंमत किती वाढली?

नवी दिल्ली | आजच्या तरुणाईमध्ये स्पो.र्ट बाईकविषयी खास आकर्षण आहे. त्यामध्ये स्पो.र्ट बाईक म्हणलं की, बहुतेक तरुणांना पहिल्या आठवतात त्या केटीएमच्या बाईक. केटीएमची एक खास क्रे.झ आहे. या गाड्यांचे लूक आणि फी.चर्स यामुळे बहुतेक ग्रा.हक केटीएम ख.रेदी करण्यास प्राधान्य देतात.

मात्र, आता केटीएमच्या गाड्यांची  प्रा.ईज वाढवली असल्याची माहिती समोर आली आहे. केटीएम सोबतच हुस्कवार्नानी देखील आपल्या बाईक्सच्या किंमतीत वा.ढ केली आहे. या नव्या किंमती 4 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात आल्या आहेत.

KTM 390 अॅडव्हें.चरच्या किंमतीत 4,485 रुपयांची वा.ढ करण्यात आली असून आता KTM 390 अॅडव्हें.चर घेण्यासाठी तब्बल 3.10 लाख रुपये मो.जावे लागणार आहेत. तसेच केटीएमने इतरही काही गाड्यांच्या किमतींमध्ये वा.ढ केली आहे.

केटीएमची सर्वात छोटी मोटारसायकल केटीएम 125 आरसीच्या किं.मतीत देखील वा.ढ करण्यात आली आहे. केटीएम 125 आरसीच्या किं.मतीत 1 हजार 466 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता ही बाईक ख.रेदी करण्यासाठी 1.63 लाख रुपये मो.जावे लागणार आहेत.

केटीएम 390 च्या किं.मतीत एक महिन्यापूर्वीच वा.ढ करण्यात आली होती. केटीएम 390 च्या किं.मतीत 1447 रुपयांची वा.ढ करण्यात आली होती. केटीएम 125 ड्युकची किं.मत 1497 रुपयांनी, केटीएम 200 ड्यूकची किंमत 2,576 रुपयांनी आणि केटीएम 250 ड्युकच्या किं.मतीत 3,192 रुपयांची वा.ढ करण्यात आली आहे.

तसेच केटीएम 250 अॅडवें.चरच्या किं.मतीत 3,667 रुपयांची वा.ढ करण्यात आली आहे. केटीएम 390 ड्युकच्या किं.मतीत 3943 रुपयांची वा.ढ करण्यात आली आहे. तर केटीएम आरसी 200 आणि केटीएम आरसी 390 च्या किं.मतींमध्ये क्रमशः 3,021 रुपये आणि 3,803 रुपयांची वा.ढ करण्यात आली आहे.

हुस्कवार्नाने देखील आपल्या काही गाड्यांच्या किंमतीत वा.ढ केली आहे. हुस्कवार्ना स्वा.र्टपि.लन 250च्या किंमतीत देखील 2,816 रुपयांची वा.ढ करण्यात आली आहे. तसेच हुस्कवार्ना वि.टपि.लन 250 च्या किंमतीत 2,818 रुपयांची वा.ढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-