मुंबई | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यापासून राज्यातील वातावरण तापलेलं दिसत आहे. या अटकेनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपाची मालिका सुरू केली आहे.
समीर वानखेडे यांच्या आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला होता. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मलिकांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत दिवाळीनंतर बाॅम्ब फोडणार असं म्हटलं होतं. त्यानंतर आता आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
नवाब मलिकांचा अंडरवर्ल्ड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या 1993 बाॅम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
फडणवीसांच्या आरोपानंतर नवाब मलिकांनी काही क्षणातच ट्विट करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आ रहा हूँ मैं’, असं नवाब मलिकांनी ट्विट करत म्हटलं आहे.
आज फडणवीसांनी काही कागदपत्रे लोकांसमोर ठेवली आहेत. त्यात म्हटलंय की, दीड लाख फूट जमीन आम्ही कवडीमोल दराने माफियांच्या मदतीने खरेदी केली. आम्हाला वाटतंय की तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत.
तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्रं उपलब्ध करुन दिली असती, असं मलिक म्हणाले आहेत. मात्र, तुम्ही जो अंडरवर्ल्डचा जो खेळ सुरू केलाय त्या सर्व गोष्टींबद्दल मी बोलणार आहे, असं मलिक म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी अंडरवर्ल्ड सोबत जो खेळ सुरू केला आहे. त्याबद्दल मी उद्या सकाळी 10 वाजता त्याविषयी बोलणार आहे, उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार असल्याचं देखील मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, फडणवीसांनी कशा प्रकारे मुंबई शहराला हाॅस्टेज बनवलं होतं याचा खुलासा उद्या करणार असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता उद्या मलिक काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट
“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”
“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”
शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार
शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप