ह्युंदाईला पाकिस्तानचा पुळका, भारतीयांनी ‘असा’ उठवला बाजार!

नवी दिल्ली | सध्या ट्विटरवर एक हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

#Hyundai baycott चा सध्या ट्विटरवर ट्रेंड सुरु आहे. ट्विटरवर ह्युंदाई पाकनं काश्मीरबद्दल ट्विट केलंय. त्यामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

ह्युंदाई पाकनं काश्मीरबद्दल ट्विट केल्यानं भारतीय लोक ट्विटरवर संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या नव्या वादामुळे कंपनीला मोठा फटका बसू शकतो.

ह्युंदाई पाकनं ट्विट करत #KashmirSolidarityDay हॅशटॅग वापरून पोस्ट केलं आहे. या पोस्टमुळे वाद चांगलाच चिघळला आहे.

आपण आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असताना त्यांच्या समर्थनात उभे राहू या, असं ट्विट ह्युंदाई पाकनं केलं होतं. त्यांच्या या पोस्टनं भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर संतप व्यक्त केला आहे.

काही वेळानंतर ही पोस्ट हटवण्यात आली. मात्र आता या पोस्टचा स्क्रिनशाॅट शेअर करत भारतीय संताप व्यक्त करत आहे. भारतीयांनी कंपनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. यामुळे आता भरपूर गाड्यांचे बुकिंग कॅन्सल होतील.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  नितेश राणे यांना मोठा झटका; कोठडीत मुक्काम वाढला

  लतादिदी अनंतात विलीन; अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदीसह अनेकांची हजेरी

 “मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये”

  ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार

 बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ