तंत्रज्ञान

ह्युंदाईच्या या कारचं रुप पालटलं; दिवाळीत लाँच होण्याची शक्यता… पाहा फोटो…

ह्युंदाई आपल्या इऑन या गाडीचे उत्पादन लवकरच थांबवणार आहे. त्याऐवजी ह्युंदाई आपली जुनी कार सॅन्ट्रोला नव्या अवतारात लाँच करणार आहे. या नव्या सॅन्ट्रोचं नवं रुप देखील समोर आलं आहे. अत्यंत आकर्षक रंगात, आकर्षक स्टाईलमध्ये ही कार डिझाईन करण्यात आली आहे. 

2011 साली इऑन लाँच करण्यात आली होती. आता या वर्षाच्या अखेरीस या कारचे उत्पादन थांबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र देशभरातील डिलर्सना याबाबत सूचना देण्यात आल्याचं कळतंय. 

इऑनची जागा आता सॅन्ट्रो घेणार आहे. ह्युंदाईच्या लोकप्रिय कारपैकी ही एक लोकप्रिय कार आहे. इऑन बंद करुन ह्युंदाई या कारचं जोरात प्रमोशन करण्याची शक्यता आहे.

आगामी सणासुदीला ही गाडी बाजारात उतरवली जाण्याची शक्यता आहे. भारतात दिवाळी हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळीत ही गाडी उतरवली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. 

पाहा फोटो-

Related image

Related image

Related image

Related image

Related image

Image result for new santro

Image result for new santro

Related image

IMPIMP