ह्युंदाईची जबरदस्त इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार, पाहा लूक आणि फिचर्स

नवी दिल्ली | दक्षिण कोरियाची आघाडीची कार निर्माता कंपनी Hyundai भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

आंतरराष्‍ट्रीय बाजारानंतर Hyundai IONIQ 5 इलेक्ट्रिक कार भारतात लवकरच लॉन्‍च होणार आहे. कंपनीने भारतात Hyundai IONIQ 5 इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Hyundai ने Ionic 5 ला कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट केलं आहे. ही कार पुढील महिन्यात जूनमध्ये लॉन्च होईल.

Hyundai IONIQ 5 चेन्नईतील Hyundai च्या प्लांटमध्ये भारतात असेंबल केले जात आहे. Ionic 5 Hyundai च्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) तयार केलं आहे.

इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी डिझाइन केलं आहे. Hyundai ची देशातील पहिली ई-GMP कार देखील असेल.

Ionic 5 इलेक्ट्रिक SUV ला रेट्रो-फ्यूचरिस्टिक लुक देण्यात आला आहे. यामध्ये सपाट पृष्ठभागासोबतच बाहेरचा भाग पण आकर्षक ठेवण्यात आला आहे. या वाहनात एलईडी लाइट्स, 20-इंच एरोडायनामिक स्टायलिश अलॉय व्हीलसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळतील.

Hyundai Ionic 57 ला स्क्वेअर DRL, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, पिक्सेलेटेड टेल लाइट्स, स्पॉयलर आणि शार्क फिन अँटेना असलेले एलईडी हेडलॅम्प मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून…” 

“…तर भाजप पुढचे 30 वर्षे सत्तेतून बाहेर जाणार नाही” 

पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

  नारायण राणेंना दिलासा; न्यायालयाकडून महत्त्वाचा निर्णय जारी

  “मुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला आहे”