“राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मी 200 टक्के सहमत”

केल्हापूर | गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणातून गर्जना केली. या गर्जनेत राज यांनी महविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला.

राज ठाकरेंच्या जोरदार भाषणानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या भूमिकेचं चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं आहे. त्यामुळे सगीकडडे एकच चर्चा पहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचे राजकारण वाढले या वक्तव्यावर आपण 200 टक्के सहमत आहोत असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणारं भाषण कालचं राज ठाकरेंचं भाषण होतं. मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूरात पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

माझ्यासारखा, सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्याची आठ खाती सांभाळली हे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सहन होत नाही. म्हणून दोन्ही काँग्रेसचे नेते माझ्यावर टीका करत असतात सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखा मी काही सोन्याचा चमचा घेउन जन्माला आलो नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांना जनता धडा शिकवेल, असा घणाघात राज यांनी केला होता. यावरुन सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…

  राज ठाकरेंना अक्कलदाढ उशीरानं आली – संजय राऊत

  पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस

पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस 

Skin Care | उन्हाळ्यात दह्याचे ‘हे’ फेसपॅक वापरा आणि मिळवा तजेलदार त्वचा!