मुंबई | शिवसेनेत बंड झाल्याने शिवसेना (Shivsena) डबघाईला आली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला पुन्हा नव्याने पक्षबांधणी आली. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यासाठी मागील महिनाभर शिवसंवाद यात्रा केली.
मागील महिन्यात शिवसेनेकडून गेलेल्या आमदारांना पुन्हा बोलावण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. त्याला कोणी दाद देत देत नसल्याने आता भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हाताशी धरुन आपला पक्ष यशस्वीरित्या फोडला हे शिवसेसेने स्वीकारले आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. विरोधी पक्षांअगोदर मित्रपक्षांचा आधी काटा काढणे हे भाजपचे धोरण मला 2019 सालीच कळाले होते, त्यामुळे मी वेगळा झालो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या गोष्टी मला 2019 साली कळाल्या त्या नितीश कुमारांना (Nitish Kumar) आता कळाल्या आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
बिहारमध्ये भाजप (BJP) आणि संयुक्त जनता दलाचे (JDU) सरकार होते. नितीश कुमारांनी ही आघाडी तोडत भाजपला धक्का देत काँग्रेस (INC) आणि राजदसोबत (RJD) सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमारांच्या भूमिकेचे स्वागत केले. त्यांनी मुंबईत काल (12 ऑगस्ट) नगरसेवकांची (Councillor) एक बैठक बोलावली होती. त्यात ते बोलत होते.
त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पमधील आमदार, खासदारांवर देखील भाष्य केले. शिवसेनेसोबत गद्दारी करुन आणि माझ्या पाठित खंजीर खूपसून गेलेले आमदार आणि खासदार निवडून येणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.
गेल्यावेळी आपण आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढलो असताना देखील शिवसेनेचा विजय झाला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील आपलाच विजय होईल अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या –
आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर? वाचा काय म्हणाले शिरसाट?
“बाबांनो हात जोडून सांगतो, मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही…”
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही भूकंप?; ‘या’ दोन नेत्यांमुळे पवारांचं टेंशन वाढलं
गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…
मोठी बातमी! भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागली वर्णी