औरंगाबाद | मराठवाडा मतदार संघातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी खास शैलीमध्ये फटकेबाजी केली आहे.
साहेबांसमोर सांगतो विक्रम काळे यांचा कार्यक्रम घेताना मनात भीतीचं असते. कारण कार्यक्रमाला बोलावून भर कार्यक्रमात काय मागेल हे सांगता येत नाही. मी खोट सांगत नाही, मागच्या वर्षी माझी बहीण सुप्रिया सुळेला कार्यक्रमाला बोलावले होते.
तो कार्यक्रम सतिश चव्हाण यांच्या सत्काराचा होता. त्यावेळी विक्रम काळे काळेंनी मी तीन टर्म आमदार आहे. मला मंत्री करा, अशी थेट मागणी केली होती, असं अजित पवारांनी सांगितलं.
वर विक्रम काळे म्हणाले भाजपमध्ये चंद्रकांत पाटील एकवेळेस आमदार होऊन मंत्री होतात. मला तीन टर्मला मंत्री करत नाहीत. त्यांनी उदाहरण पण चंद्रकांत पाटलांच दिलं.
सतिश चव्हाण म्हणाले कार्यक्रम माझा आहे. माझं दिलं सोडून आणि स्वत:चं मागत बसला. हे असला विक्रम आहे. त्यामुळे मी इतका दबकत दबकत आलो की, काही न सांगितलेलं बरं, अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.
विक्रम काळेंच्या लक्षात आलं की, इथे सतिश चव्हाण बसलेले आहेत. तेव्हा मंत्रीपद एकट्यासाठी मागणं बर नाही. सतिश चव्हाण वरिष्ठ आहेत. त्यांनाही मंत्री करा, अशी मागणी केली. एकाला मंत्री करा असं म्हटलं असतं तर विक्रम काळेचा नंबर कटला असता, असंही अजित पवारांनी सांंगितलं.
राज्यातील आमदार निधीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तरीदेखील आमदारांच्या मागण्या कमी होत नाहीत. साहेबांनी मला अर्थमंत्रालय दिले तेव्हा आमदार निधी मी दोन कोटी केला.
दरम्यान, आता आमदार निधी पाच कोटी आहे. तरीही समाधान मिळत नाही. आत्ताच सतिश चव्हाण म्हणाले की, हा निधी आणखी वाढवा. विक्रम काळे यांनीही अनेक मागण्या केल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
चोरट्यांचा नाद खुळा! थेट बुलडोझरने फोडलं ATMचं मशीन; पाहा व्हिडीओ
भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल