शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून मी निराश झालो- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या राज्य सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते दररोज वेगवेगळे मुद्दे उकरून केंद्रावर टीका करत आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी या नेत्यांकडून हे ‘कव्हरिंग फायर’ सुरु आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे सत्ता मिळवण्यासाठी उतावळे झाल्याचं शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचं हे वक्तव्य ऐकून मी निराश झालो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती. शरद पवार यांना सद्यपरिस्थितीचे पुरेपूर आकलन आहे. मात्र केवळ राज्य सरकारला वाचवण्यासाठी ते वेगवेगळे आरोप करून कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

केंद्र सरकारने राज्याला एकही व्हेंटिलेटर आणि पीपीई किट दिले नाही, असा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला होता. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला तरी फारतर जास्तीच्या 1100 व्हेंटिलेटर्सची गरज पडले. मग राज्य सरकार केंद्राकडे 4000 व्हेंटिलेटर्स का मागत आहे, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे

-शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

-कोल्हापुरात खजाना गवसला; शेतकऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं सापडलं

-शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथं पत्र; केली ‘ही’ मागणी

-एक जूननंतर लॉकडाउन हटवणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…