मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वादळी सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष केलेलं पहायला मिळालं.
राज ठाकरेंनी सभेत जोरदार टीकांंचा पाऊस पाडला. त्यानंतर राजकीय वातावरण जोरदार तापल्याचं पहायाला मिळालं.
राज्यात सध्या अनेकजण एकमेंकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या कल्चरमध्ये जाती जातीमध्ये भांडण लावणे हे कधी दिसलं नाही. पण, शरद पवार यांच्या प्रत्येक ऍक्शनमध्ये “जातीयवाद” आहे, असा घाणाघात पाटलांनी केला आहे.
शरद पवार म्हणतात की मनसे ही भाजपची बी टीम आहे. पण, याच पवारांनी राज ठाकरे यांना घेवून बी टीम तयार करून लाव रे तो व्हिडीओ केलं. आम्ही तसं काही करत नाही.
शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय. इतक्या जास्त वयात ते कसं काम करतात. ते कसे संपर्कात असतात याची माहिती घेतोय, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Good News: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
“देवेंद्रजी, तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर….”; काॅंग्रेसचा घणाघात
“पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा”
Corona Update: ‘या’ ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले”