मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील शिंदे यांचे अभिनंदन केलं आहे. शरद पवारांनी शिंदे यांचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पवारांनी म्हटलं आहे, ‘राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
गुरुवारी राजभवनमध्ये शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.. तुम्ही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आहात, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
“देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस मिळणं कठीण”
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले…