घरात बसून मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; उद्धव ठाकरेंचा मिश्किल अंदाज

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच आजच्या दिवशी आपण संकल्प करूया घरात राहून कोरोनाला पळवून लावूया, असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं. मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही घरात बसून काय करता, असं मला अनेकजण विचारतात. मी आमच्या मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो. तुम्हीही घरात बसा अन् तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका, अशा मिश्किल अंदाजात जनतेने घरीच बसावं असं आवाहान त्यांनी केलं.

मला या संकटाच्या काळात अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. कुटुंबासोबत अनेक जण पहिल्यांदाच आपला पाडवा साजरा करत आहेत. गमावलेला आनंद आपण पुन्हा कमावलाय. त्यामुळे अनेक जण घरीच वाचन करणं, संगीत ऐकणं अशा प्रकारचे छंद जोपासत आहेत. तुमचं असंच सहकार्य येत्या काळात ठेवा आपण या रोगाला लवकरच पळवून लावू, असा विश्वास त्यांनी आज पाडव्याच्या निमित्ताने व्यक्त केला.

आज मी तुम्हाला काहीही निगेटीव्ह सांगायला आलेलो नाही. तुम्हाला सणाच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे. सगळ्यांना संकटाच्या गांभीर्याबाबत कल्पना आली आहे. त्यामुळे शासन जसं वारंवार आवाहन करतंय त्याप्रमाणे घरात बसा. घराबाहेर पडू नका, असं ते म्हणाले.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार आहेत. ती बंद केली जाणार नाहीत. नागरिकांनी कृपया दुकानांवर गर्दी करू नये. अन्नधान्याचा खूप मोठा साठा आपल्याकडे शिल्लक आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये, अशा शब्दात त्यांनी राज्यातील जनतेला आश्वस्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-संकटाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तयार- मोहन भागवत

-लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

-कोरोनाच्या भीषण संकटात सानिया मिर्झा गरिबांना करणार मदत

-हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु- उद्धव ठाकरे

-हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करा आणि सर्व शंका विचारा; उद्धव ठाकरेंचं आवाहन